चंदगड तालुक्यात ईद-ए-मिलाद उत्सवात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2018

चंदगड तालुक्यात ईद-ए-मिलाद उत्सवात साजरी

चंदगड / प्रतिनिधी - चंदगड तालुक्यातील चंदगडसह माणगाव, कोवाड, डुक्करवाडी, बागिलगे येथे ईद ए मिलास उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जेसीबी ऑपरेटर उमरखान, मुस्ताकखान व इतर ऑपरेटर मुस्लिम युवक बांधवाना डुक्करवाडी येथे मिठाई व शिरखुरमा देवून ईदच्या शुभेच्छा देणेत आल्या. याप्रसंगी डुक्करवाडीचे सरपंच राजू शिवनगेकर, रत्नहार पाटील, देना बँक कर्मचारी राजेंद्र वरपे, संतोष घोळसे, राज पाटील, सौ. शारदा वरपे, सौ. पुजा घोळसे व ग्रामस्थ उपस्थित होते. ईदच्या शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन साहील-सायली वरपे यांनी केले. आभार बाबूराव वरपे यांनी मानले. ईद-ए-मिलाद निमित्त बाबूराव वरपे यांनी माणगांव, कोवाड, तांबुळवाडी, हलकर्णी फाटा,डुक्करवाडी येथील मुस्लिम बांधवांच्या भेटी घेवून त्यांना मिठाई देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या.