किणी ग्रामपंचायत व अॅटलास कंपनीच्या वतीने मोफत तपासणी शिबीर - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2018

किणी ग्रामपंचायत व अॅटलास कंपनीच्या वतीने मोफत तपासणी शिबीर


हलकर्णी / प्रतिनिधी -
किणी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत व ऑर्लीकॉन फेअर फिल्ड अॅटलास लिमिटेड शिनोळी याच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. 23) सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायतीच्या सभागृहात डोळ्यांचे मोफत तपासणी शिबिर आयोजीत केले आहे. यावेळी डॉ. सिध्दार्थ पुजारी हे मोतीबिंदु शस्त्रक्रिया, मधुमेह, लहान मुलांचा दृष्टीदोष या विषयी तपासणी करुण त्यावर उपाय व उपचार या विषयी माहीती देणार आहेत. यावेळी पत्रकार अशोक पाटील उपस्थितीत राहणार आहेत. इच्छुकांनी या संधीला लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.