आमरोळी शाळेसमोरील विद्युत डीपी धोकादायक स्थितीत - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2018

आमरोळी शाळेसमोरील विद्युत डीपी धोकादायक स्थितीत

आमरोळी-पोरेवाडी-मुगळी मार्गाच्या वळणावरील धोकादायक उघडी डी. पी. 

चंदगड / प्रतिनिधी
आमरोळी (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय प्रांगणातच विद्युत डी.पी. आहे. हि डी. पी. उघडी आहे. या डी. पी. जवळून पोरेवाडी मुगळी जाणारा रस्ता जातो. डी. पी. जवळ हा रस्ता वळण घेत असून हे वळण अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे वाहनचालकांना येथे वळण घेताना वाहने डी. पी. वर धडकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शालेय मुलांना या उघड्या डि. पी. मुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विज कंपनीने या डी. पी. ची जागा अन्यत्र हलवावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
डीपीच्या शेजारी शालेय मुले शाळेच्या सुट्टीत खेळत असतात. असल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका संभवतो. डीपी जवळच स्वच्छतागृह असल्यामुळे मुलांच्या जीविताला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. या डीपीतून अधून मधून ठीणगी उडणे असे प्रकार घडलेले आहेत. भविष्यात तार तुटणे किंवा डीपी जळणे आदी घटना घडू शकतात. त्यामुळे या डीपीची जागा बदलून ती अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलवावी व ती बंदीस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अभियंता चंदगड यांना ग्रामपंचायत, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापनाकडूनही निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करुन हि विद्युत डी. पी. अन्यत्र हलवावी अशी मागणी आहे.


No comments:

Post a Comment