चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका
संत गाडगेबाबा परिट समाजाच्या वतीने चंदगड येथील राम मंदिरात रविवार 23 डिंसेबर 2018 रोजी संत गाडगेबाबा यांची 62 वी जंयती साजरी करण्यात येणार आहे. भुदरगडच्या
पं. स. सदस्या सौ. स्नेहल परिट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात जेष्ठ
किर्तनकार ह. भ. प. विठ्ठल महाराज फड यांचे व्याख्यान होईल. यावेळी डॉ. विठ्ठल
परिट, बाबू परिट, मारूती परीट, दिलीप परिट, आनंदी परिट, औंदूबर परिट यांचा सत्कार
करणेत येणार आहे. या वेळी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत रवळनाथ मंदिर ते धर्मवीर
संभाजी चौकात स्वच्छता मोहीम राबवणेत येणार आहे. यावेळी राजेंद्र परिट, अमर आयरेकर,
दत्ता परिट, आनंदराव परिट आदी मायवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्व
समाज बंधू भगिनीनी हजर रहावे असे आवाहन अध्यक्ष राजाराम परिट यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment