मुगळी:- जातीच्या दाखल्यांचे वाटप करताना प्रांताधिकारी विजया पांगारकर व मान्यवर. |
मजरे
कार्वे / प्रतिनिधी
मुगळी (ता.
चंदगड) येथे महाराजस्व अभियान अंतर्गत गाव भेट, मराठा जातीच्या दाखल्यांचे वाटप व
मराठा दाखल्याविषयी मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
चंदगडचे
तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक करून येथील मंडल धिकारी राजश्री पचडी
यांनी आज अखेर 90 पाणंद
रस्ते खुले करून जनतेची निस्वार्थी सेवा केल्याबद्दल कौतुक केले. प्रांताधिकारी
विजया पांगारकर यांनी ``मराठा
समाजातील लोकांसाठी जातीचे दाखले देण्याचे काम सुरू असून त्यासाठी कोणकोणती
कागदपत्रे जमा करावेत व दाखला कसा मिळवावा याविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक
कार्यासाठी पुढाकार घेतलेल्या लोकांना प्रशासन खंबीरपणे पाठबळ देईल, अशी ग्वाही यावेळी प्रांताधिकारी यांनी
दिली.`` चंदगड पंचायत समितीचे सभापती बबन देसाई यांनी या विभागात गेल्या सहा
महिन्यात मंडलाधिकारी राजश्री पचंडी यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. यासाठी
पंचायत समितीकडून यापुढे लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान सातवणे
येथील झरी ते केरवडे
पर्यंतच्या 2.5 किमी
रस्त्याचे उद्घाटन करून पाणंद रस्ता फलकाचे अनावरण प्रांताधिकारी विजया पांगारकर
यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुगळीचे चे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment