विंझणे येथे आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2018

विंझणे येथे आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

विंझणे (ता. चंदगड) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करताना आमदार संध्यादेवी कुपेकर. शेजारी उद्योजक दत्तु विंझणेकर व इतर. 

चंदगड / प्रतिनिधी
विंझणे (ता. चंदगड) येथे आमदार फंडातून मंजूर रस्ता, बांधण्यात येणाऱ्या दलित समाज मंदिराचे व सामाजिक कार्यकर्ते दत्तु संतु विंझणेकर यांनी आपल्या वैयक्तिक रित्या खर्च करून बांधलेल्या गाव प्रवेश स्वागत कमानीचे उद्घाटन आमदार संध्यादेवी कुपेकर व सरपंच सौ. लिलाबाई दत्तू विंझणेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक दत्तात्रय वायदंडे, राहुल देसाई, उद्योजक दत्तु विंझणेकर, केशव निकम, सुहास शेंडे, बाबू विझनेकर, शंकर पवार, बाळू तिबिले, दशरथ कांबळे, लक्ष्मण सोसोलकर, भागोजी कांबळे, आप्पा बागवे, विजू बागवे, बंडू कांबळे, नामदेव पताडे, अंकुश कांबळे, रघु पोवार, ग्रामपंचायत सदस्य किर्ती ग्रुपचे कार्यकर्ते तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment