चंदगड / प्रतिनिधी
मुख्यमंत्र्याची
भेट घेवुन अपंगाच्या समस्या मांडाव्यात. यासाठी त्यांची भेट घडवुन द्यावी. या
मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या आंदोलन कर्त्यांचे चंदगड तहसिल
कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आज शनिवारी एकोणीस दिवस होता. तरीही मुख्यमंत्र्याची
भेट होत नाही. एकोणीस दिवस झाले तरी आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने सतीश ओमाना
कांबळे (रा. कडलगे बुद्रुक, ता. चंदगड) यांनी न्यायासाठी केव्हाही, कोठेही, कधीही
आत्मदहन करणार असल्याचा दिला आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी
कोल्हापूर, कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक, चंदगडचे
तहसिलदार व चंदगडचे पोलिस निरिक्षक यांना निवेदनातून दिला आहे.
No comments:
Post a Comment