![]() |
डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे विशेष श्रमसंस्कार शिबीरावेळी बोलताना पो. नि. श्रीप्रसाद यादव व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
देशातील
युवाशक्तीच्या व्यतिमत्वाचा सर्वांगीण विकास राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून
होत असतो. या विभागातील विद्यार्थ्यी समाजात मिळून मिसळून वागतात. त्यांच्या
समस्या जाणून घेतात. साक्षरतेची कामे करतात, पर्यावरण संरक्षणासाठी झटतात, हा
उपक्रम स्तुत्य आहे. खेडो-पाड्यात अशी शिबीरे प्रेरणादायी ठरतात. सामाजिक व्रत
यातून जपले जावू शकते. त्याचा आनंद मिळतो असे प्रतिपादन चंदगडचे पो.निरीक्षक श्रीप्रसाद
यादव यांनी केले. दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व
गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णीचे विशेष श्रमसंस्कार
शिबीर डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे सुरु आहे. त्यावेळी ते बोलत होते.
प्रास्ताविक
वरिष्ठ विभाग प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी केले. यावेळी
व्यासपीठावर अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, उपसरपंच
मनिषा वर्पे, मारूती वर्पे, गोपाळ
वर्पे, विठ्ठल पाटील, डॉ. रघुनाथ
पाटील, दत्तु वर्पे, जानबा
कांबळे, प्रा. एस. एम. कांबळे, राणबा
ढेरे, विठ्ठल यादव, आपाजी
वर्पे, नामदेव गावडे, सुनिल
देवण, जनार्दन सुतार, प्रा. विलास
नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय.
निंबाळकर उपस्थित होते. स्वागत सरपंच राजु शिवणगेकर यांनी केले. प्राचार्य डॉ.
निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात शिबीरीतुन तरूणाईला नवनिर्मानतेची प्रेरणा मिळते. कार्यक्रमातून
गावाला नवीन ओळख निर्माण करा असे सांगितले. सुत्रसंचालन प्रा. एस. एस. कुचेकर
यांनी केले तर आभार प्रा. नंदकुमार पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment