खेळामुळे सुप्त गुण विसकीत होतात – उद्योजक रमेशराव रेडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2018

खेळामुळे सुप्त गुण विसकीत होतात – उद्योजक रमेशराव रेडेकर

कोवाड (ता. चंदगड) येथे सीएम चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बोलताना रमेशराव रेडेकर, अॅड. हेमंत कोलेकर व इतर मान्यवर. 

कोवाड / प्रतिनिधी
जीवनामध्ये खेळालासुध्दा महत्व आहे. शारिरीक क्षमतेबरोबरच व्यक्तितील इतर महत्वाच्या गुणांचा विकास खेळामुळे घडतो. बहुतेक लोक खेळाकडे मनोरंजन व शारीरीक व्यायाम या दृष्टीकोनातून पाहतात. खरे पाहता खेळामुळे व्यक्तितील सुप्त गुण  विकसित होत असल्याने जीवनात खेळाला महत्व द्यावे,असे प्रतिपादन उद्योजक रमेशराव रेडेकर यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथे श्रीराम विद्यालयाच्या पटांगणावर सीएम चषक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रमेशराव रेडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष अॅड. हेमंत कोलेकर होते. 
दि किणी कर्यात शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव देसाई उपसरपंच विष्णू आडाव, संजय रेडेकर ,शिरीष देसाई उपस्थित होते. रमेशराव रेडकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी सिद्धार्थ देसाई यांचे वडील शिरीष देसाई यांचा सुरेश वांद्रे यांच्या हस्ते सत्कार झाला. राष्ट्रीय खेळाडू वल्लभ पाटीलचा अॅड.हेमंत कोलेकर यांच्या हस्ते सत्कार झाला. भाऊ खूप गुरव यांनी यांनी प्रास्ताविक केले सुरेश वांद्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी सर्व खेळाडूंची भोजनाची व्यवस्था केलेल्या विठ्ठल व्हन्याळ  कर यांचाही सत्कार झाला. यावेळी संदीप शहापूरकर, संजय कुंभार, विष्णू पाटील, अशोक पांडव, संजय पाटील, आर. टी. पाटील, पांडुरंग मोहनगेकर उपस्थित होते.

कोवाड (ता. चंदगड) येथे सीएम चषक कब्बड्डी स्पर्धेवेळी उपस्थित 
असलेल्या प्रो-कबड्डी पुणेरी पलटन संघाचा खेळाडू गुरुनाथ मोरे
याचा सत्कार करताना भावकु गुरव, सुरेश वांद्रे व राजू पाटील व इतर.


सीएम चषक कब्बड्डी स्पर्धेतील सामाना सुरु असतानाचा एक क्षण.

No comments:

Post a Comment