श्री क्षेत्र वाटंगी येथे बाळूमामा मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2018

श्री क्षेत्र वाटंगी येथे बाळूमामा मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन

वाटंगी (ता. आजरा) येथील बाळुमामा मंदिर

चंदगड / प्रतिनिधी
वाटंगी (ता. आजरा) येथे सद्गुरू बाळुमामा मंदिराच्या चतुर्थ वर्धापनदिना कार्यक्रम 2 ते 5 जानेवारी 2019 या कालावधीत होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बुधवारी (ता. 2) सकाळी शिवलिंग व नंदी प्राणप्रतिष्ठापना, रात्री नऊनंतर ह. भ .प. तातोबा पाटील महाराज आरळगुंडी यांचे कीर्तन व भजन मंडळ उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी (ता. 3) भजनाचे कार्यक्रम होतील. शुक्रवार (ता. 4) लघुरुद्र महाअभिषेक रात्री 9 ते 11 ह. भ. प. सुशांत सुरेश गुरव महाराज युवा वारकरी रत्ना भूषण पुरस्कृत यांचे कीर्तन होईल. शनिवार (ता. 5) मुख्य दिवस असून सकाळी 5 वाजता काकड आरती, सकाळी 8.30  नंतर पालखी मिरवणूक, दुपारी 12.15  वाजता महारती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल. याचा भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाला वाटंगी, अर्जुनवाडी, सिरसंगी, मसोली, चित्रानगर, मोरेवाडी, नागनवाडी, सुलगांव, वाटंगी, मोरेवाडी, साळगांव, मडिलगे, शेळप, विंझणे, चंदगड, कासार कांडगाव, चाफवडे, दाभिल, मेंढोली, आमरोळी, मलगेवाडी, चांदेवाडी, महागोंड, साळगाव, देवर्डे, पेरणोली, बोजुर्डी, सातवणे व अडकूर येथील भजनी मंडळाच्या दिंड्या येणार आहेत.

No comments:

Post a Comment