तरुणांनी व्यावसायीक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवावा - तुकाराम पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2018

तरुणांनी व्यावसायीक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवावा - तुकाराम पाटील



दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
तालुक्यातील व्यक्तीने तालुक्यातील जनतेचा विचार करणे गरजेचे आहे. आजच्या तरुण पिढीने व्यावसाईक दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन आपल्या परीसरातील वाईट गोष्टींना थारा न देता चांगल्या गोष्टींना महत्त्व दिले पाहीजे. या संबंधीचे मार्गदर्शन युवकांना मिळावे. ही गोष्ट डोळ्यांसमोर ठेऊन युवा फौंडेशनची स्थापणा केली असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी सांगितले. युवा फौंडेशन स्पर्धा परीक्षा केंद्र पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील कार्यालयाला चंदगड लाईव्ह न्युज चे प्रतिनिधी संतोष सुतार यांनी सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी श्री. पाटील स्पर्धा केंद्राविषयी माहीती देताना बोलत होते. तालुक्यातील युवकांसाठी फौंडेशनमार्फत चांगल्या योजना राबविण्याचा संकल्प आहे. येणाऱ्या काही दिवसात त्या विषयी नियोजन सुरू असल्याची माहीती श्री. पाटील यांनी दिली. यावेळी प्रविण सुर्यवंशी व विद्यार्थी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment