ग्राहक हाच बाजारपेठेचा राजा होय - प्रा.ए.बी. मगदुम, ' राष्ट्रीय ग्राहक दिन ' साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2018

ग्राहक हाच बाजारपेठेचा राजा होय - प्रा.ए.बी. मगदुम, ' राष्ट्रीय ग्राहक दिन ' साजरा



दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
'जन्मापासुन मरेपर्यंत माणूस हा ग्राहक असतो.१९८७ साली ग्राहक सरंक्षण कायदा लागु झाला. महाराष्ट्राची ग्राहक सरंक्षण यत्रंणा सक्षम ग्राहकासाठी न्याय कायदा अमलात आहे. ग्राहकांची जाणिव, जागृतीची जाणिव व्हावी. ग्राहक हा विचारांचा निर्दशक आहे. ग्राहकाची व्याख्या सरक्षण कायद्यात आहे. दररोजची पिळवणुक, फसवणुक, लुबाडणुक स्वतः थाबंऊ शकतो. ग्राहक चळवळीला पाठींबा देणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त वस्तु खरेदी करणे म्हणजे साधनसपंत्ती नष्ट करणे होय. निरोगी पर्यावरणाचा हक्क आपल्याला आहे.पर्यावरणाचे सवंर्धन करा.व्यव्हारात ग्राहक जागरुक राहणे गरजेचे आहे. " असे प्रतिपादन प्रा.ए.बी. मगदुम यांनी केले. ते गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ व यशवंतराव चव्हाण वरीष्ठ महाविद्यालय येथे ' राष्ट्रीय ग्राहक सरक्षण दिन 'निमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.वाय. निबांळकर होते.
प्रास्ताविक कु. रुतुजा काबंळे यांनी केले. यावेळी प्राचार्य निबांळकर म्हणाले, " आज परीस्थिती बदलत चालली आहे. फार मोठा बदल वाणिज्य विभागात होताना दिसतोय. ग्राहकाला आपण राजा म्हणतो पण तसे दिसत नाही. अपमानस्पद वागणुक ग्राहकाला दिली जात आहे. ग्राहकाने खरेदी वेळी जागरूकता पाळणे गरजेचे आहे. बाजारात अनेक कपंण्याचा वावर वाढला आहे. अनेक वस्तु खरेदी करताना ग्राहक जागरूक असणे गरजेचे आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी समाजात याविषयी जागरूकता करावी  " असे आवाहण केले. यावेळी प्रा.व्ही.व्ही.कोलकार, प्रा.जी.जे. गावडे, प्रा.जी.पी. काबंळे,प्रा.एस.वाय.आरबोळी, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठया सख्येने उपस्थित होते. सुत्रसचांलन कु.मयुरी पाटील हीने तर आभार सोनाली पाटील हिने मानले.


No comments:

Post a Comment