डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे पशुवैद्यकीय शिबीर घेण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे पशुधन चिकिसा
वैद्यकिय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जनावरांच्या विविध रोगाबद्दलची
माहीती देण्यात आली. येथील ग्रामस्थांनी आपल्या जनीवरांची मोफत तपासणी करून घेतली. या शिबीरीत
पशुवैद्यकीय चिकित्सा डॉ. अनिल शिवघन व
वनौपचारक एस. एस. बेळ्ळी यांनी जनावारांची तपासणी केली. डुक्करवाडी येथे यशवंतराव
चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णीचे
विशेष श्रमसंस्कार शिबीराराच्या वेळी हे जनावारांचे शिबीर घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच राजु शिवणगेकर होते.
प्रास्ताविक दिपक कांबळे यांनी केले. मान्यवरांचे
स्वागत डॉ. मधुकर जाधव, प्रा. एन. एम.
कुचेकर यांनी केले. पशुधन चिकित्सा शिबीराचे उद्घाटन श्रीफळ वाढवुन ग्रामपंचायत
सदस्य राणबा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये म्हैस, बैल, गायी, शेळी आदी जनावारांची तपासणी झाली. तसेच मोफत औषधे पुरवण्यात आले.
यावेळी 35 शेतकऱ्यांनी आपल्या जनावारांची तपासणी करुन घेतली. रघुनाथ सुतार, गोपाळ पाटील, सिद्दापा कांबळे, सटुप्पा घोळसे, तुकाराम गावडे, एकनाथ गावडे, रामचंद्र वर्पे, जोतीबा तेऊरवाडकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment