सातवणे येथे शेत पाणंद अतिक्रमणमुक्त रस्त्याचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2018

सातवणे येथे शेत पाणंद अतिक्रमणमुक्त रस्त्याचा शुभारंभ

सातवणे (ता. चंदगड) येथे शेत पाणंद अतिक्रमणमुक्त रस्त्याचा शुभारंभ प्रसंगी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार शिवाजी शिंदे, सरपंच रामभाऊ पारसे व इतर.

चंदगड / प्रतिनिधी
सातवणे (ता. चंदगड) येथे महसूल विभाग अंतर्गत महाराजस्व अभियान अंतर्गत पालकमंत्री शेत पाणंद अतिक्रमणमुक्त रस्ता योजनेतून झरी ते केरवडे सीमेपर्यंत, मासरणकर शेत ते पाटीलवाडा शेत पर्यंत 2.5 कि मी 22 फूट रुंदीचा रस्त्याचा शुभारंभ प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार चंदगड शिवाजी शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच रामभाऊ पारसे यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी हे चंदगडी तालुक्याला लाभल्यामुळे पानंद ने मोकळा श्वास घेतला असल्याचे सांगितले. या रस्त्यासाठी 1 लाख 35  हजार रुपये खर्च येणार असल्याचे यावेळी सांगितले. मंडळ अधिकारी राजश्री पचडी, उपसरपंच सातवणे, सदस्य पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्त अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जॉन डिसोझा, किशोर पाटील, राजू गोंधळी यांनी केले.


No comments:

Post a Comment