पर्यटकांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वनात अनुसुचित प्रकार करू नये, अन्यथा कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2018

पर्यटकांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वनात अनुसुचित प्रकार करू नये, अन्यथा कारवाई



दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
पाटणे वन परीक्षेत्रातील महीपाळगड, कलानंदिगड, आबेंवाडी धरण, तिलारीनगर परीसर या ठिकाणी वर्षाचा शेवट करण्यासाठी 30 किंवा 31 डिसेंबर 2018 रोजी पर्यटक येतात. पर्यटकांनी वनपरीक्षेत्रात कोणताही अनुसुचित प्रकार करू नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल असे आवाहन पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल एम. एन. परब यांनी केले आहे.
वनक्षेत्रपाल श्री. परब म्हणाले, ``वनक्षेत्रात अवैद्य रित्या प्रवेश करणे, अग्नी पेटवणे, आरडाओरड करणे, मद्यप्राशन करुण दंगाकरणे इत्यादी अनुसुचित प्रकार घडु नये. तरीही कोणी असे कृत्य करताना आढळल्यास कार्यरत असलेल्या गस्ती पथकाकडून वन विभागाची प्रचलीत कडक कारवाई करण्यात येईल अशी माहीती दिली. वनपाल डी. जी. पाटील, डी. एल. पाटील, ए. डी. शिंदे, एम. एन. धामणकर यांच्या नियोजनाखाली गस्ती पथक नेमणुक केले आहे.


No comments:

Post a Comment