चंदगड नगरपंचायतीसाठी पाठपुरावा सुरूच, मुंबईत ठाण - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2018

चंदगड नगरपंचायतीसाठी पाठपुरावा सुरूच, मुंबईत ठाणचंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथे नगरपंचायत व्हावी यासाठी चंदगडचे नागरिक सातत्याने पाठपुरावा करत असुन  चंदगडचे युवा उद्योगपती सुनिल काणेकर व आजरा तालुक्यातील भाजपचे जेष्ठ रमेश रेडेकर यांच्या शिष्ठमंडळाने पुन्हा मंत्रालयात ठाण मारले आहे. चंदगड नगरपंचायतीसाठी चंदगड शहरवासियांनी पाठपुरावा कायम ठेवला आहे. या कामी भाजपचे कार्यकर्ते सुनिल काणेकर, आजरा भाजपा जेष्ठ रमेश रेडेकर, चंद्रकांत दाणी, ॲड. विजय कडूकर आदीच्या शिष्टमंडळाकडुन सातत्याने मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, खात्याचे प्रमुख आदींच्याकडे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नगरपंचायतीबाबतीचा मुद्दा प्रगतीपथावर असून याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे श्री. काणेकर यांनी सांगीतले.


No comments:

Post a Comment