![]() |
डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे विशेष श्रमसंस्कार शिबीरात श्रमदान करताना विद्यार्थ्यी. |
चंदगड / प्रतिनिधी
"एनएसएस
स्वप्नांच गाव आहे. त्यातून आपल्याला व्यासपीठ मिळत. राष्ट्रीय सेवा योजनामुळे
प्रत्यकाचे आयुष्य बदलते. आपणच आपला आत्मशोध घ्यावा, विचार करणे ही एक कला आहे, श्रमाला
संस्काराची जोड देण्यासाठी एनएसएस शिबीर मार्गदर्शक ठरत. आपला दृष्टीकोन बदलण्यासाठी
ही शिबीरे उपयुक्त ठरतात. संमोहन मन प्रसन्न करत, नवविचारांना प्रेरणा देते, बौधिक
विकास करण्याच काम संमोहन करते, नेहमी मोठी स्वप्ने पहा" असे
उद्गार संमोहन तज्ञ प्रा. यु. एस. पाटील यांनी काढले. डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे
यशवंतराव चव्हाण महाविद्याल व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालया
मार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय श्रमसंस्कार शिबीरारात "संमोहन" या
विषयावर बोलताना व्यक्त केले. माजी उपसरपंच गजानन ढेरे अध्यक्षस्थानी होते.
उद्धाटन
प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी केले. रोपट्याला पाणी घालुन नवीन संदेश दिला. यावेळी
व्यासपीठावर सरपंच राजु शिवणगेकर, विलास नाईक, संतोष
सुतार, राजेंद्र शिवणगेकर, राणबा
ढेरे, मारूती वर्पे, उपसरपंच
मनिषा वर्पे, डॉ. राजेंद्र कोळेकर, किरण पाटील, अमोल देवन, डॉ. रघुनाथ पाटील, यमनाप्पा वर्पे, तानाजी कांबळे, रघुनाथ सुतार, गोपाळ पाटील, सिद्दापा कांबळे, सटुप्पा घोळसे, तुकाराम
गावडे, एकनाथ गावडे, रामचंद्र
वर्पे, जोतीबा तेऊरवाडकर आदीसह ग्रामस्थ
उपस्थीत होते. प्रकल्प अधिकारी डॉ. मधुकर जाधव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment