![]() |
म्हांळुगे येथील विद्यार्थ्याच्या बसच्या गैरसोयीबद्दल आागारप्रमुखांना निवेदन देताना मनसेचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यींनी. |
चंदगड / प्रतिनिधी
म्हांळुगे (ता. चंदगड) येथील शालेय विद्यार्थ्यांची
एसटी आगाराकडून होणारी गैरसोय दुर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगडच्या
वतीने म्हांळुगे गावच्या विद्यार्थ्यांनीनीसह मनसे तालुकाध्यक्ष सत्वशील पाटील,
उपाध्यक्ष अमर कांबळे यांनी चंदगड आगार प्रमुख यांची भेट घेऊन एसटी बसची गैरसोयीची कैफीयत मांडली. चंदगड म्हांळुगे मार्गावर बस वेळेत येत नाहीत, बस थांब्यावर थांबत नाहीत, बस वाहक उर्मट बोलने, बऱ्याचशा बस वाटेतच बंद पडणे अशा घटना घडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसान होत आहे. या होण्याऱ्या गैरसोय बाबत चंदगड आगार प्रमुखांना विचारणा केली.
त्यावेळी आगारप्रमुखांनी दोन दिवसात बस सुरु करण्याचे आश्वासन देवून एसटीच्या चालक
व वाहक यांनाही प्रवाशांची चांगली वर्तवणूक ठेवण्याच्या सुचना करू असे आश्वासन
दिले.
No comments:
Post a Comment