फाटकवाडी (ता. चंदगड) येथे क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रेडेकर फौडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर व सहकारी. |
चंदगड /
प्रतिनिधी
ग्रामीण
भागातील युवकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न रमेशराव रेडेकर युवा
फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे. यासाठीच मागील दोन महिन्यांमध्ये
पंधराहून अधिक ठिकाणी रेडेकर फाउंडेशनच्या मार्फत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले
होते. यातून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असल्याचे मत फाटकवाडी (ता.
चंदगड) येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रेडेकर फौडेशनचे
अध्यक्ष आदित्य रेडेकर यांनी चंदगड लाईव्हशी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी
युवा नेते नितीन फटक, मोहन पाटील, सिद्धेश
कोरगांवकर, दीपक
पाटील, कुमार
पाटील, भगवान
मोहाडकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment