सुंडी हायस्कूल येथे डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2018

सुंडी हायस्कूल येथे डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन



मजरे कारवे / प्रतिनिधी
सुंडी (ता. चंदगड) येथील  संत तुकाराम हायस्कूल मध्ये डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन शिक्षण विस्ताराधिकारी नवी मुंबईचे योगेश हन्नुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष, डॉ. राजाभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी  वाकोबा आंबेवाडकर व सौ नीता पाटील प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी नूतन इमारतीच्या देणगी फलकाचे अनावरण राजाभाऊ पाटील व शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष झिमान्ना पाटील यांच्या हस्ते डिजिटल शाळा देणगीदार फलकाचे अनावरण झाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. डी. गोडसे यांनी केले. याप्रसंगी डिजिटल शाळेचे महत्त्व प्रा. प्राध्यापक मायाप्पा पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी विलास कांबळे यांनी अधोरेखित केले. यावेळी एस. डी. पाटील व एस. एन. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळेचे आजी-माजी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन बी. व्ही. केसरकर यांनी केले.  आभार एम. के. भुजबळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment