कोवाड मध्ये शनिवारी सीएम चषक कबड्डीचा थरार - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2018

कोवाड मध्ये शनिवारी सीएम चषक कबड्डीचा थरार


कोवाड / प्रतिनिधी
चंदगड तालुका भाजपा युवा मोर्चाच्यावतीने शनिवार (ता. २९) रोजी दुपारी दोन वाजता सीएम चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कोवाड येथील श्रीराम विद्यालयाच्या पटांगणावर स्पर्धा होणार आहेत. सरपंच अनिता भोगण यांच्या अध्यक्षस्थेखाली उद्घाटन समारंभ होणार आहे. आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुरेश वांद्रे यांनी दिली. उद्घाटन समारंभाला गोपाळराव पाटील, नेसरी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, उद्योजक रमेशराव रेडेकर, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, अशोकराव देसाई उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा दुपारी तीन वाजता सुरू होणार आहेत. विजेत्या संघाना १५००१, १०००१, ७००१ अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी इच्छुक संघानी स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेश वांद्रे व भावकू गुरव यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment