अलबादेवी येथील गंजलेले पोल बदलल्याने ग्रामस्थांतून समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2018

अलबादेवी येथील गंजलेले पोल बदलल्याने ग्रामस्थांतून समाधान

अलबादेवी (ता. चंदगड) येथे गंजलेले पोल बदलताना कर्मचारी.

चंदगड / प्रतिनिधी
अलबादेवी (ता. चंदगड) येथे पाच ते सहा पोल गंजलेल्या असल्यामुळे ते कधीही पडून जीवितहानी होण्याची शक्यता होती. यासंदर्भात गेल्या वर्षभरापासून श्रीकांत नेवगे यांच्यासह ग्रामस्थांनी वीज वितरणचे अभियंता विकास लोधी यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. त्याचबरोबर पंचायत समिती सभापती बबनराव देसाई यांनी ही मासिक सभेत हा विषय मार्गी लावण्याच्या सुचना श्री. लोधी यांना अनेक वेळा दिल्या होत्या. या सर्व गोष्टीची दखल दखल घेत विज वितरणने नादुरुस्त पोल बदलले.  या कामी उपसरपंच राजाराम पाडले, माजी सरपंच धोंडिबा घोळसे, विठोबा मोरे, गुरुनाथ देवळे, वायरमन अजित पाटील यांचे ही सहकार्य मिळाले. याकामी धोंडिबा घोळसे आणि ग्रामसेवक अश्विनी कुंभार यांचेही सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment