स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्द ठेवा – विभागीय समन्वयक राजेंद्र कोळेकर - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2018

स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्द ठेवा – विभागीय समन्वयक राजेंद्र कोळेकर

चंदगड / प्रतिनिधी
"राष्ट्रप्रेमाने प्रेरीत झालेली युवाशक्ती निर्माण झाली पाहिजेत. स्वत:ला स्वंयसिद्द बनवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतुन चांगले विचार जोपासा. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी  जिद्द पाहिजे. मान सन्मानासाठी अभ्यास करा. माणूस-मानसापासुन दुर झालाय. माणुसकीची नाती जपा. माता-पिता शिक्षकांचा आदर करा. याच वयात आयुष्याला आकार देता येतो. शिबीरीतुन प्रेरणा मिळण्याची संधी प्राप्त होते" असे विचार डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयामार्फत आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरारात 'व्यसनाधिनता व युवक' या विषयावर बोलताना विभागीय समन्वयक राजेंद्र कोळेकर यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच गजानन ढेरे होते. 
कार्यक्रमाचे उद्धाटन सरपंच राजु शिवणगेकर यांनी रोपट्याला पाणी घालुन केले. स्वागत प्रा. एन. एम. कुचेकर, प्रा. नंदु पाटील आदीनी केले. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच फर्जद व मुळशी पॅटर्न या मधील कलाकार अमोल देवन यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी विलास नाईक, संतोष सुतार, प्रा व्ही,. व्ही. कोलकार, राजेंद्र शिवणगेकर, राणबा ढेरे, मारूती वर्पे, उपसरपंच मनिषा वर्पे, किरण पाटील, यमनाप्पा वर्पे, तानाजी कांबळे, प्रा. सुप्रिया यादव, प्रा. गितांजली पाटील, प्रा. परसु गावडे, प्रकाश बागडी, गोविंद नाईक, राजू बागडी, प्रदिप सावंत, स्वंयसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन अश्विनी गावडे यांनी केले. आभार अक्षय बोकडे यांनी मानले.    


No comments:

Post a Comment