![]() |
उत्साळी (ता. चंदगड) येथे मोफत आरोग्य शिबीरात रुग्णांची तपासणी कताना. |
चंदगड / प्रतिनिधी
उत्साळी (ता. चंदगड) येथे कै. केदारी रेडेकर
रुग्णांलयामार्फत ग्रामपंचायत उत्साळी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य
तपासणी शिबिरात दीडशेहून अधिक रुग्णांनी तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. माधुरी सावंत-भोसले
यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराला सुरुवात झाली.
डॉ. उदयकुमार कोळी व त्यांचे सहकारी, अडकूर प्राथमिक
आरोग्य केंद्राच्या आश्मी कोवाडकर यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी उपसरपंच
खंडेराव देसाई, वसंत सुतार, रुक्माणा मटकर, सुरेखा दळवी, सौ. सुनीता मोरे, शालेय
व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संतोष देसाई, उपाध्यक्ष सौ. वर्षा कदम, सदस्य राजा
अंबुलकर, काकासो देसाई, शिक्षक संभाजी रणजीत देसाई, शिवाजी आपटेकर, पुंडलिक दळवी,
संभाजी देसाई, पांडुरंग दळवी, ग्रामसेवक अश्विनी कुंभार, आशा सेविका गीता सुतार, अंगणवाडी
सेविका माया देसाई आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वागत संतोष सावंत भोसले
यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत कदम यांनी केले. आभार पोलीस पाटील भरत
देसाई यांनी मानले.
No comments:
Post a Comment