माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबीर - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2018

माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबीर

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबीरावेळी उपस्थित मान्यवर. 

चंदगड / प्रतिनिधी
कै. र. भा. माडखोलकर यांच्या १ डिसेंबर २०१८ रोजी ८३ व्या जयंतीनिमित्त चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरात ४० रक्तदात्यानी रक्तदान करून ' रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ' ही देशसेवची उक्ती सत्यात उतरवून शिबीराच्या यशस्वीतेसाठी हातभार लावला.
सर्व रक्तदात्यांचे व बेळगांव ब्लड बँकेंच्या सर्व सेवकांचे अभिनंदन व स्वागत प्रा. डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्पाधिकारी प्रा. एस. एन. पाटील, प्रा. शाहु गावडे, डॉ. एन. के. पाटील, डॉ. एम. एन. मासाळ, डॉ. ए. पी. पाटील, पी. पी. धुरी, एस. बी. हसुरे, शिवाजी पाटील, शुभांगी मुळीक यांनी विषेश परीश्रम घेतले. प्राचार्य एस. वाय. होनगेकर (विवेकानंद कॉलेज, कोल्हापुर), प्राचार्य पी. आर. पाटील, सौ. व्ही. आर. बांदीवडेकर याच्या उपस्थित कार्यक्रम सपंन्न झाला. यावेळी बेळगांव ब्लड बॅंकेचे डॉक्टर, कर्मचारी,  महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसचांलन प्रा. ए. डी. काबंळे यांनी केले. आभार एम. डी. गावडे यांनी मानले.


No comments:

Post a Comment