झांबरे ते बांदा रस्त्याची मागणी, पर्यटनाला मिळणार वाव - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2018

झांबरे ते बांदा रस्त्याची मागणी, पर्यटनाला मिळणार वाव



चंदगड / प्रतिनिधी
झांबरे (ता. चंदगड) येथील गावापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हद्दीतील केवळ दहा कीलोमीटर अंतर रस्त्याचे काम झाल्यास चंदगड ते बांदा हे अंतर फक्त चाळीत ते पंचेचाळीस कि. मी होणार आहे. यामुळे बिगर घाटाचा हा रस्ता कमी अंतरात वाहतुकीला उपलब्ध होऊन यामुळे चंदगड तालुक्याच्या पर्यटनाला अधिक वाव मिळणार आहे.
या रस्त्याच्या कामी युवा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष समीर पिळणकर  व कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या सहकार्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या रस्त्याच्या कामी बांधकाम विभागाकडून हालचाली होण्यासाठी सुरुवात झाली आहे. या मार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ-दहा गावातील लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व येईल. बांदा, पणजी घाटवीणा वाहतुक करता येणार आहे. मात्र या कामासाठी बांधकाम मंत्रालयाकडून ताबडतोब कार्यवाही होणे आवश्यक आहे. येत्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमापूर्वी जर या रस्त्याच्या कामी हालचाली झाल्या तर कीत्येक वर्ष डोंगर-कपारीत  भौतिक सुविधा पासून वंचित असलेल्या ग्रामीण रहीवाशांना हा रस्ता मोलाचा ठरणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी आमदार हाळवणकर यांच्या सहकार्याने भा.ज.पा युवा उपाध्यक्ष पिळणकर व सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.


No comments:

Post a Comment