हास्य हे निरोगी व आनंदी जीवनाची गुरूकिल्ली आहे - आत्माराम पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2018

हास्य हे निरोगी व आनंदी जीवनाची गुरूकिल्ली आहे - आत्माराम पाटील



चंदगड / प्रतिनिधी
"सद्याच्या धावत्या जगात हास्य लोप पावत चालले आहे. प्रत्येकजन चिंतातूर दिसतो आहे. हास्य ही निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली आहे. हसत हसत स्वत:ची कामे करा, त्यामुळे काम हे काम वाटणार नाही असे उद्गार  आत्माराम पाटील यांनी काढले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात आयोजीत केलेल्या वाड:मय मंडळाच्या उद्घाटन समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक स्वागत प्रा. एच. के. गावडे यांनी केले. श्री. पाटील पुढे म्हणाले "ज्ञानार्जनाबरोबर अंगाची कौशल्ये जर विकसित केली तर भविष्यातील बऱ्याच समस्या सुटुन जातील. त्यासाठी विद्यार्थांनी अंगभूत कौशल्यांची ओळख करून घेतली पाहीजे. प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी महाविद्यालयातील प्रत्यक विद्यार्थ्याने संधीचा फायदा घेवुन त्याचा उचित उपयोग करावा. भेावताली अनेक माणसे आदर्श म्हणून उभी आहेत. त्यांचा शोध घ्यावा व आपले व्यतिमत्व संपन्न करावे असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर प्रा. एस. डी. तावदारे, प्रा. एस. एम. शहापूरकर,  प्रा. एस. व्ही. चिंचनगी, प्रा. यु. एस. पाटील, डॉ. ज्योती व्हटकर यांच्यासह विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येत उपस्थीत होते. शेवटी आभार प्रा. ए. एम. पाटोळे यानी मानले.


No comments:

Post a Comment