डुक्करवाडी- बागिलगे
(ता. चंदगड) परीसरात मका, शाळु, ऊस, गवत आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
केले आहे. सातेरीचेमाळ, बेरडी तळे, निकम टेक आदी
परिसरात १५ गव्यांचा व ७ ते ८ सांबराचा कळप गेले महीनाभर डोणी नावच्या शेतात तळ
ठोकुण आहे.
सध्यांकाळी
व रात्री मका, ऊस लागण, खोडवा, शाळु, बाजरी व गवताच्या गज्यांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान सुरू आहे. बेरडी तळे येथील पाडुंरग विठोबा ढेरे याच्या शाळु
पिकाचे, काजु व नारळाच्या झाडांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान केले आहे. मारूती ढेरे, राजु जाधव, अमृत निकम, लक्ष्मण
गावडे, चंद्रकांत पाटील, शिवाजी
पाटील, सभांजी यादव, गणपत
देसाई, सभांजी आवडण, लक्ष्मण
विठोबा पाटील, नारायण निकम, हरी निकम, प्रकाश
जाधव आदी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. गवा व
सांबर याच्या वावराणे शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण
निर्माण झाले आहे. डुक्करवाडी व बागिलगे येथील काही महिलांचा गव्यांने पाठलाग केल्याने
महिलांनी या ठिकाणी जाणेच बंद केले आहे. वन विभागाने पिकांची नुकसान भरपाई देण्याबरोबरच
या गवे व सांबराना हुसकाऊण लावावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे.
No comments:
Post a Comment