कोवाड ते ढोलगरवाडी फाटा रस्त्याबाबत अभियंता वेदपाठक यांनी घेतली ग्रामस्थांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2018

कोवाड ते ढोलगरवाडी फाटा रस्त्याबाबत अभियंता वेदपाठक यांनी घेतली ग्रामस्थांची भेट

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे ग्रामस्थांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना कार्यकारी अभियंता वेदपाठक व इतर.
कोवाड / प्रतिनिधी 
कोवाड ते ढोलगरवाडी फाटा या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या ग्रामस्थांची आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वेदपाठक यांनी भेट घेतली. ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात बैठक झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांनी कोवाड ते ढोलगरवाडी फाटा या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली. प्रशासनाने रस्त्यांच्या कामांवर देखरेख ठेवावी व कामात हालगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. रस्त्याच्या बांधकामाबाबत ग्रामस्थांची गाऱ्हानी ऐकून घेऊन पाठक यांनी उर्वरित रस्त्याच्या कामाबाबत लवकरचं मंजूरीसाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी उपअभियंता एस. ए. मांजरेकर, जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण उपस्थित होते. कोवाड ते ढोलगरवाडी या रस्त्याच्या बांधकामाबाबत  ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याबाबत पाठक यांनी सुचना केली. अतिक्रमण, गटारे, मोऱ्या व रुंदीकरणाला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी अरूण पाटील, जनार्दन देसाई, नाना डसके, वसंत सुतार, वसंत जोशीलकर, विवेक मनगुतकर, प्रकाश भोगूलकर, नरसिंग बाचूळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment