कार्वेतील फुले विद्यालयात 92 -93 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2018

कार्वेतील फुले विद्यालयात 92 -93 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

मजरे कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयात आयोजित सन 1992 -93 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उपस्थित विद्यार्थ्यी व शिक्षक. 
मजरे कार्वे / प्रतिनिधी
मजरे कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयात सन 1992 -93 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एस. बी. ओऊळकर होते. प्रास्ताविक पुंडलिक पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सौ. कमल पाटील यांनी गायलेल्या प्रार्थनेने झाली. 
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना एस. बी. ओऊळकर म्हणाले, ``समाजामध्ये गुरुशिष्यांचे नाते अजूनही टिकून आहे. आपले विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊन उच्च पदावर पोचले आहेत, ते पाहून गुरुजनांचा उर आनंदाने भरून येतो, हीच गुरुजनांना दिलेली गुरुदक्षिणा होय. संस्कारांमुळे आमचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.`` यावेळी या दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक आर. आर. पाटील, के. जी. शिरोडकर, एस. बी. पाटील, डी. डी. पाटील, बी. व्ही. कागणकर,  एस. एच. शेख, एम. एस. कोले, सौ. कमल पाटील या गुरुजनांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. या मध्ये संजीवनी जिरगे, प्रताप सूर्यवंशी, राजू बिर्जे, किरण गडेकर, भाऊ पाटील, महादेव कांबळे, शंकर कागणकर, उत्तम हारकारे, भारती कुबल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आर. आर. पाटील, के. जी. शिरोडकर, एस. बी. पाटील, बी. व्ही. कागणकर, एस. एच. शेख, एम. एस. कोले, कमल पाटील यां गुरुजनांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आशिर्वाद दिले. सुत्रसंचालन पी. जी. चव्हाण यांनी केले. आभार संजीवनी जिरगे यांनी मांडले.


No comments:

Post a Comment