अडकूर येथे 1 ते 7 जानेवारीला शिवशक्ती ज्यूनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2018

अडकूर येथे 1 ते 7 जानेवारीला शिवशक्ती ज्यूनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे आयोजन


अडकूर / प्रतिनिधी 
नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) चे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर मंगळवार 1 जानेवारी ते सोमवार 7 जानेवारी 2019 पर्यंत अडकूर येथे संपन्न होत आहे. सरपंच श्रीमती यशोदा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन चंदगड सभापती बबन देसाई यांच्या हस्ते होणार आहे. प्रमूख पाहूणे म्हणून तहसिलदार शिवाजीराव शिंदे, गोकुळचे संचालक राजेश पाटील, जी. एन. गणाचारी, अभय देसाई उपस्थित राहणार आहेत. बुधवार ता. 2 रोजी `श्रम संस्कारात युवकांचा सहभाग` या विषयावर गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांचे, गुरूवारी `समाजाच्या जडणघडणीत संस्काराची मुल्ये` या विषयावर कोल्हापरच्या के. एम. सी. कॉलेजचे प्रा. राजेंद्र कोळेकर, शुकवारी चंदगड कॉलेजचे प्रा. ए. वाय. पाटील यांचे `महात्मा गांधी व श्रमप्रतिष्ठा` या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार 5 रोजी `चंदगड लाईव्ह न्यूज पोर्टल चॅनेलच्या` वतीने `आजची तरुणाई व बदलते तंत्रज्ञान` या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तर पत्रकार राजेंद्र शिवनगेकर यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डी. जी. कांबळे, प्रकल्प अधिकारी प्रा. एम. पी. पाटील, प्रा. रामदास बिर्जे, प्रा. व्ही. पी. पाटील यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment