कोवाड (ता. चंदगड) येथे सीएम चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेतील विजेता अप्पी पाटील युवा संघ व उपविजेता कोवाडचा दर्पण संघ. |
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील श्री राम विद्यालयाच्या पटांगणावर दोन दिवस चाललेल्या सी. एम. चषक कब्बडी स्पर्धेत महागावच्या अप्पी पाटील युवा मंच कब्बडी संघाने कोवाडच्या दर्पण संघावर 15 गुणांनी मात करुन विजेतेपद पटकावले तर दर्पण स्पोर्ट्स क्लब कोवाडचा संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक किणी कब्बडी संघाने पटकावला तर उत्तेजनार्थ ब्रम्हदेव संघ तेऊरवाड़ी राहिला. यामध्ये चंदगड मतदार संघातील एकूण 32 संघानी आपला सहभाग नोंदविला होता.
जि. प. सदस्य हेमंत कोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा नेते रमेशराव रेडेकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे संयोजन भाजपा चंदगड़ तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुरेश वांद्रे अणि तालुकाध्यक्ष भावकु गुरव यांनी केले होते. उपांत्य फेरीसाठी झालेल्या पहिल्या सामन्यात सचिन राऊत अणि स्वप्निल खंडाले यांच्या यशस्वी चढाइने महागाव संघाने तेऊरवाड़ी संघावर 19 गुणानी मात करुन अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळविला. गोविंद पाटील, मुज्जमिल बावगी यांच्या चढाईच्या अणि राकेश पाटील, विश्वनाथ पाटील यांच्या पक्कडीच्या जोरावर कीणी संघाला 7 गुणांनी पराभूत करुन दुसऱ्या उपांत्य सामन्यात दर्पण संघाने बाजी मारली. तुल्यबळ असलेल्या दोन्ही संघामुळे अंतिम सामन्याची रंगत अधिकच वाढली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघानी आक्रमकता दाखविली. परंतु महागांव संघाच्या सचिन राऊतच्या उत्कृष्ठ चढाईने आणि सांघिक खेळाच्या जोरावर दर्पण स्पोर्ट्स क्लबचा 16 गुणांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले. यावेळी रामा यादव, सुर्यकांत पाटील, संजय कुंभार, प्रा. आर. टी. पाटील, पांडुरंग मोहनगेकर, हणमंत कुंभार, बाळु पाटील, भरत पाटील, प्रा. विनायक पाटील, राजू पाटील, आर. के. पाटील, चेतन बांदीवडेकर, भरमु पाटील, विठ्ठल व्हन्याळकर उपस्थित होते.
कोवाड (ता. चंदगड) येथे सीएम चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेतील एक अटीतटीचा क्षण. |
No comments:
Post a Comment