चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर मुख्याध्यापक संघामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलने यशाची परंपरा राखली. प्राथमिक विभागात कु. यश विकास सुतार (इ. ६ वी) तर माध्यमिक विभागात कौस्तुभ गुरव, सानिका गावडे, भुमिका निकम, प्रदिप येसणे, आदित्य पेडणेकर, ऋतुजा कुबल या विद्यार्थ्याची जिल्हास्तरावर परीक्षेसाठी निवड झाली आहे.
४४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इ. ६ वी ते ८ विद्यार्थी उपकरणात ' कु. भुमिका निकम, यश सुतार या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या जैवऑक्सिजन भट्टी' या उपकरणाला द्वितीय क्रमांक मिळाला. तर इ. ९ वी. ते १२ वी विद्यार्थी उपकरणे या विभागात कु. अपूर्वा जाधव, खतिजा शेख या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'शाश्वत उर्जा ' या उपकरणास द्वितीय क्रमांक मिळाला. बालवीर सेवा पथक बेळगुंदी यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धत प्राथमिक गटात तेजस बेरडे याने पाचवा क्रमांक तर माध्यमिक गटात वैभव कांबळे याने सातवा क्रमांक पटकावला. प्राचार्य व्ही. जी. तुपारे, उपप्राचार्य ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. आर. देवण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना टी. एस. चांदेकर, टी. टी. बेरडे, बी. आर. चिगरे, सुरज तुपारे, सौ. जाधव, सौ. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment