अडकूर येथे श्री शिवशक्ती हायस्कूलच्या श्रमसंस्कार शिबीरामध्ये रोपट्याला पाणी घालून उदघाटन करताना तहसिलदार शिवाजी शिंदे, सरपंच यशोधा कांबळे, अभय देसाई, प्राचार्य कांबळ व इतर |
कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. युवकांनी आपल्यातील
क्षमता ओळखून न्यूनगंड बाजूला सारायला हवेत. जिद्द, चिकाटी आणि अपार
कष्ट केल्यास उतुंग यश मिळवता येते असे विचार चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे यानी
व्यक्त केले. अडकूर (ता. चंदगड) येथे श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीराचा शुभारंभ त्यांच्या हस्ते
झाला. त्यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच
श्रीमती यशोदा कांबळे होत्या.
प्रारंभी तहसिलदार शिंदे, नागनवाडीच्या
मंडल अधिकारी राजश्री पचंडी, जी.
एन. गणाचारी, अभय देसाई यांच्या हस्ते संत गाडगे महाराज
प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन झाले. स्वागत प्राचार्य डि. जी. कांबळे यांनी केले.
शिबिराचे उद्घाटन तहसिलदार शिंदे यांनी रोपट्याला पाणी घालून केले. यावेळी अभय
देसाई, प्राचार्य कांबळे, सहसचिव जी. एन. गणाचारी, काव्यप्रेमी
शिक्षक मंचचे मुंबई जिल्हा अध्यक्ष अॅड. बाळासाहेब तोरस्कर, कोळीवाडयाची
शान या प्रसिद्ध गाण्याचे कवी व गायक प्रदिप पवार, निल या मराठी
चित्रपटाचे कथा-पटकथा-लेखक व दिग्दर्शक संजय सिंगल बार यांनी मनोगते व्यक्त केली. प्रदिप
पवार यांनी काव्य गायन तर तोरस्कर यांनी कविता वाचन केले. यावेळी उपसरपंच अनिल
कांबळे, कृष्णा रेगडे, ग्रामसेवक
पी. एस. मडव, प्रा. पी. डी.
पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. रामदास बिर्जे यांच्यासह सर्व
ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा. एम. पी. पाटील यानी केले. सुत्रसंचालन आर.
व्ही. देसाई यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस. जी. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment