![]() |
अडकूर (ता. चंदगड) येथे पाणंद रस्ता रूंदीकरण कामांचा शुभारंभ करताना तहसिलदार शिवाजी शिंदे, मंडल अधिकारी पचंडी, अभय देसाई आदि. |
अडकूर / प्रतिनिधी
अडकूर (ता.
चंदगड) येथील सार्वजनिक विहीर ते मुख्य रस्ता
या पाणंद रस्त्याचे अतिक्रमण काढणे व त्याचे रूंदीकरण करणे या कामाचा शुभारंभ
चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. तहसिलदार श्री.
शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनवाडीच्या मंडल अधिकारी राजश्री पचंडी यांच्या
सहकार्याने हा पाणंद रस्ता खुला करण्यात येत आहे. आज जेसिबी यंत्राच्या साह्याने
रुंदीकरणास सुरवात करण्यात आले. यावेळी सरपंच यशोधा कांबळे, उपसरपंच
अनिल कांबळे, अभय देसाई, मंडल अधिकारी
राजश्री पचंडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment