मटाचे संपत पाटील यांना 'आदर्श पत्रकार' पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2019

मटाचे संपत पाटील यांना 'आदर्श पत्रकार' पुरस्कार जाहीर

संपत पाटील
चंदगड / प्रतिनिधी 
दै. महाराष्ट्र टाईम्सचे चंदगड तालुका प्रतिनिधी संपत रामाणा पाटील यांना मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्यावतीने 'आदर्श पत्रकार' पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी हि निवड जाहीर केली. संपत पाटील हे गेली 15 वर्षे पत्रकारीतेत कार्यरत आहेत. निर्भीड व अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. शेती, शिक्षण,  आरोग्य यासह सामाजिक विषयांवर त्यांनी विशेष लेखन केले आहे. पत्रकारीतेतील आजपर्यंतच्या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन जिल्हा पत्रकार संघटनेने त्याना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला आहे. १३ जानेवारी रोजी पत्रकार  दिनानिमित्त खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असणार आहेत. पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या हरते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव समीर देशपांडे, जिल्हा अध्यक्ष चारुदत्त जोशी, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत. श्री. पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

1 comment:

Post a Comment