चांगले आरोग्य म्हणजेच अलंकार होय - पत्रकार अनिल धुपदाळे - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2019

चांगले आरोग्य म्हणजेच अलंकार होय - पत्रकार अनिल धुपदाळे

डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे विशेष श्रमसंस्कार शिबीरात बोलताना पत्रकार अनिल धुपदाळे, नंदकुमार ढेरे, चेतन शेरेगार, शिक्षक व विद्यार्थी. 
चंदगड / प्रतिनिधी
चांगले आरोग्य म्हणजेच अलंकार होय. आपल्याला चांगले आरोग्य असायला हवे तर त्यासाठी व्यायाम, कामाची सवय ठेवणे जरूरीचे आहे. ज्याचे आरोग्य चांगले त्याचे शरीर व मन चांगले असते. आज देशाला चांगल्या विचारा बरोबर चांगले आरोग्य असलेल्या पिढीची गरज आहे. देश शक्तीशाली बनण्यासाठी चांगले युवक बनण्यासाची गरज आहे असे प्रतिपादन डुक्करवाडी (ता.चंदगड) येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णीचे विशेष श्रमसंस्कार शिबीराराच्या आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हा रिपेार्टर असोशिएशनचे उपाध्यक्ष अनिल धुपदाळे यांनी  व्यक्त केले. या अध्यक्षस्थानी मारूती वर्पे होते. पत्रकार चेतन शेरेगार प्रमुख उपस्थित होते. 
या मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन अनिल धुपदाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन झाले. यावेळी पत्रकार नंदकुमार ढेरे म्हणाले, ``ज्या आई-वडिलांनी आपल्याला वाढवले मोठे केले. त्यांना विसरू नका. काम करण्यास लाजु नका. कामामुळेच माणसाला प्रतिष्ठा मिळते. एनएनएस कॅम्प हा विद्यार्थी दशेतील एक अविभाज्य घटक आहे. त्यातुन विद्यार्थी घडतो असे सांगितले. यावेळी प्रकाश पाटील, भिमा ढेरे, नारायण साबळे, जानबा ढेरे, पांडुरंग साबळे, विष्णु ढेरे, जोतीबा ढेरे, शिवाजी ढेरे, मारूती साबळे, दत्तु वर्पे, राजेंद्र जाधव,  प्रकाश जाधव, विलास नाईक, प्रा. एन. एम. तायडे, प्रा. कुचेकर, प्रा. पाटील उपस्थीत होते., सुत्रसंचालन दिपक कांबळे तर आभार सुरेश घेाळसे यांनी मानले.   
                  

No comments:

Post a Comment