धुमडेवाडी येथे तालुकास्तरिय विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2019

धुमडेवाडी येथे तालुकास्तरिय विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धा संपन्न


चंदगड / प्रतिनिधी
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे जोतिर्लींग मंदिरासमोर भव्य व प्रशस्त मंडपात उत्साही वातावरणात सांस्कृतिक स्पर्धा प्राथमिक शाळेत संपन्न झाल्या. गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली  व सभापती बबनराव देसाई, माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, उपसभापती विठाबाई मुरकुटे, माजी सभापती शांताराम पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्धाटन झाले. या कार्यक्रमाच्या दरम्यान स्पर्धेतील यशस्वी गटाना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.  जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, एस. के. ग्रुपचे सुनिल काणेकर, अजिंक्यतारा उद्योग समुहाचे अविनाश पाटील यांच्या हस्ते प्रतिमापुजन झाले. दीपप्रज्वलन सरपंच सौ. पार्वती पाटील, श्रीपती पाटील, धेाडीबा पाटील, मोहन पाटील, गोविंद पाटील, जोतीबा पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले,  दोन दिवस या स्पर्धा चालल्या, सौ रूपा खांडेकर, व सौ,मनिषा शिवणगेकर, ॲड. अनंत कांबळे यांच्या उपस्थीतत पार पडल्या. यासाठी केंद्रातील सर्व मुख्याघ्यापक, शिक्षक ईत्यादीनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन अवधुत भोसले, सदानंद  पाटील, सुभाष चांदीलकर यानी केले. आभार हंबीरराव कदम यानी मानले. 


No comments:

Post a Comment