कानुर खुर्द येथील क्रिकेट स्पर्धेत कुडाळ संघ प्रथम, सागर इलेव्हन द्वीतीय - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2019

कानुर खुर्द येथील क्रिकेट स्पर्धेत कुडाळ संघ प्रथम, सागर इलेव्हन द्वीतीय

कानुर खुर्द (ता. चंदगड) येथे क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजेता कुडाळ संघ. 
चंदगड / प्रतिनिधी 
कानुर खुर्द (ता. चंदगड) येथील नवज्योत मंडळाच्या वतीने दत्तजयंती व दहिकाला यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मर्यादित आठ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कुडाळ संघाने 21000 रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले. सागर इलेव्हन संघ बेळगावने 15001 रुपयांचे द्वीतीय क्रमांकाचे बक्षिस मिळविले. तर पंचशील गवसे संघाने तृतीय क्रमांकाचे 10001 रुपायंचे बक्षिस  पटकावले. स्पर्धेमध्ये एकूण 54 संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धा तब्बल 15 दिवस चालल्या. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सरपंच निवृत्ती पाटील यांचे कडून कुडाळ संघाला देण्यात आले. महेश गवस व विशाल गावडे यांच्या हस्ते सागर इलेव्हन संघाला द्वीतीय बक्षिस देण्यात आले. तर विनायक बिरजे व पांडुरंग गावडे यांच्या हस्ते तृतीय बक्षिस पंचशील गवसे संघाला देण्यात आले. यासह उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट संघ, मालिका वीर यासह शिस्तबंध्द संघ म्हणून कुडाळ संघाला गौरविण्यात आले. प्रेक्षकांच्या आवडीचा संघ वाघराळी तर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा संघ कुडाळ व बेळगाव हे ठरले. सर्व विजेत्यांना चषके कै. रामा राया सावंत यांच्या स्मरणार्थ सागर सावंत यांच्याकडून देण्यात आली.

No comments:

Post a Comment