आदर्श शासन व्यवस्थेचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज – प्रा. जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2019

आदर्श शासन व्यवस्थेचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज – प्रा. जाधव



दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
"आदर्श शासन व्यवस्थेचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी भारतीय लोकांमध्ये स्वाभिमान निर्माण केला. त्यांची मने व मनगट बळकट केली. गुणी माणसांची पारख करुण त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी सोपवली व त्यात ते यशस्वी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्या, प्रशासन व्यवस्था, अर्थव्यवस्था जगात श्रेष्ठ होती. शेतकऱ्यांना सर्व सेवा पुरवणारे व त्यांच्या शेतीमालाला हमीभाव देणारे विश्वाला वंदनीय असे एकमेव राजे होते." असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्राध्यापक मधुकर जाधव यांनी केले. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयाच्या वतीने मुकुटेवाडी येथे आयोजीत केलेल्या श्रमदान शिबीर कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच सो. संगिता गोजगेकर होत्या. यावेळी तुळजाआई सेवा सोसायटीचे अध्यक्ष सटुप्पा भालेकर, उपाध्यक्ष देवाप्पा भालेकर प्रमुख उपस्थित होते. प्रा. जाधव पुढे म्हणाले, " छत्रपतींनी सामान्यातुन असामान्य माणसे निर्माण केली. त्याच्या मध्ये राष्ट्रभक्तिची भावना निर्माण केली. त्याच बरोबर एक आदर्शवत समाजव्यवस्था निर्माण केली. आजचा युवक छत्रपतींना आपले दैवत मानतो. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे." सुत्रसंचालन तुकाराम ओबंळे गटातील विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रा. विलास नाईक यांनी मानले.


No comments:

Post a Comment