संपत पाटील, चंदगड
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा. यासाठी गेले वर्षभर
ग्रामस्थांसह सर्व पक्षीयांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना आज अखेर
यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात चंदगडला नगरपंचायतीचा
दर्जा दिल्याची अधिकृत घोषणा केली. याबाबतच्या अद्यादेशावर स्वाक्षरी करुन नगरपंचायत
विभागाकडे पाठविण्यात आला. या निर्णयाचे चंदगडवासीयांनी फटाकड्या व कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केली.
2014 साली सरकारने अद्यादेश काढून तालुका व मोठी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी
नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा अध्यादेश काढला होता. त्यानुसार जिल्ह्यातील हुपरी,
शिरोळ यासह अन्य ठिकाणच्या ग्रामपंचातींना नगरपंचायतींचा दर्जा दिला होता. मात्र
चंदगडला तांत्रिक कारण पुढे करुन चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यास
सरकारने दोन वर्षे झुलवत ठेवले होते. सरकारच्या या धोरणाविरोधात चंदगड वासियांनी
असहकार पुकारला. याची पहिली पायरी म्हणून चंदगडच्या सरपंच सुजाता सातवणेकर
यांच्यासह 17 सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर तब्बल चार
वेळा सरकारने जाहीर केलेल्या चंदगड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला. नगरपंचायत
कृती समिती, सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेते यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची
भेट घेतली. चंदगडकरांनी दोन वेळा चंदगड बंद ठेवून विरोध दर्शविला होता. नगरपंचायत
कृती समितीच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण केले होते. घर टू घर जावून लोकांच्यामध्ये
जनजागृती केली. बहिष्काराचे अस्त्र कायम ठेवल्याने सरकारने लोकांच्या भावना
विचारात घेवून सकारात्मक निर्णय घेतला. आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सतेज
पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत विधान
परिषदेतही आवाज उठविला. चंदगडला नगरपंचायत लवकरात लवकर मिळावी यासाठी भाजपचे आमदार
सुरेश हाळवणकर यांच्याकरवी रमेशराव रेडेकर यांनी विशेष प्रयत्न केले. चंदगड ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीचा
दर्जा मिळावा, यासाठी ग्रामस्थ व नेतेमंडळींनी केलेल्या प्रयत्नांचे आज नगरपंचायत
मंजूर झाल्याने प्रयत्नाचे फळ मिळाले. दरम्यान आज मंत्रालयात भाजपचे नेते रमेशराव रेडेकर, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाळराव
पाटील, शिवाजीराव पाटील, नामदेव पाटील, सुनिल काणेकर, चंद्रकांत दाणी, विजय कडूकर,
सचिन नेसरीकर, मिलिंद सडेकर, उमेश शेलार उपस्थित होते.
मुदत संपल्यानंतर चंदगड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी
सरपंचपद मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले होते. मात्र ग्रामस्थांनी चंदगड
ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा. या मागणीसाठी चंदगड ग्रामस्थांनी
घेतलेल्या निर्णयाला 40 वर्षानंतर सरपंच मिळूनही मोठ्या दिलाने निवडणुक न
लढविण्याचा निर्णय घेवून मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठींबा
दिला. त्यामुळे आज नगरपंचायतीच्या दर्जामध्ये त्यांचाही हातभार आहे.
चंदगड लाईव्ह न्युजचे कौतुक
चंदगड लाईव्ह न्युज सुरु झाल्यापासून या न्युज चॅनेल पोर्टलने
नगरपंचायत होण्यासाठीच्या प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडीवर लक्ष ठेवून वेळोवेळी
येणारे अपडेट लोकांच्यापर्यंत पोहोचविले होते. चंदगड लाईव्ह न्युज व व्हीडीओ स्वरुपातील अपडेट
लोकांच्यापर्यंत पोहोचविल्याने चंदगड लाईव्ह न्युजचे चंदगड वासीयांनी कौतुक केले.
चंदगडवासियांच्या एकजुटीचा विजय - शिवानंद हुंबरवाडी
चंदगड ग्रामपंचायतीला आज नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. हा तमाम चंदगड वासीय नागरीक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या कामी चंदगड, आजरा, गडहिंग्लज यासह अन्य सर्वपक्षीय नेत्यांनी ज्यांनी-ज्यांनी मदत केली. त्याचे सर्वांचे व शासनाचेही आम्ही आम्ही ऋण व्यक्त करतो.
चंदगड नगरपंचात कृती समिती अध्यक्ष शिवानंद हुंबरवाडी
![]() |
चंदगड नगरपंचायत झाल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी चंदगड येथील भाजप कार्यालयासमोर फटाके वाजवून गुलालाची उधळण व फटाक्या वाजवून आनंदोत्सव साजरा केला. आनंदोत्सव करताना भाजपचे कार्यकर्ते. |
No comments:
Post a Comment