अर्जुनचा दोरीवरील खेळ समाजमनाला स्पर्श करतो - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2019

अर्जुनचा दोरीवरील खेळ समाजमनाला स्पर्श करतो

कोवाड : येथील बाजारपेठेत सुरु असलेला हाच मुलीच्या वेशातील अर्जूनचा दोरीवरचा खेळ. 
अशोक पाटील / कोवाड
येथील बाजारपेठेत सध्या दोरीवर चालणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाचा चित्तथरारका खेळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ढोलचा ठेका व संगीताच्या तालावर दिवसभर दोरीवरून चालत मनोरंजन करणारा अर्जुन चक्क मुलीच्या वेषात आहे. आपला उघडा संसार आयुषभर पाठीवर घेऊन कोस मैल फिराणाऱ्या दील प्रसाद यांच्या कोलाट्याच्या खेळाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. स्वतःच्या आयुष्याची दोरी घट करण्यासाठी अर्जुचा दोरीवरचा सुरू असलेला हा खेळ समाजमनाला स्पर्श करून जातो. पामगड जिल्ह्यातील बिलासपूर गावांतून कोलाट्याचा खेळ करणारे दील प्रसाद यांचे हे कुटुंब दोन दिवसापूर्वी कोवाड बाजारपेठेत आले आहे. बाजरापेठेतील प्रत्येक रस्त्यावर त्यांचा हा खेळ सुरू आहे. मुलगा अर्जुन हा मुलीच्या वेषात संगीताच्या तालावर दोरीवरुन चालतो. दोरीवरून ताटातून चालताना बघणा-यांच्या काळजाचा ठेका चुकतो. तर पायात लोखंडी चाक घेऊन चालताना श्वास रोखून धरावा लागतो. अर्जूनचे वडील ढोलच्या निनादावर ठेका धरतात. तर आई मुलाच्या चालण्यावर नजर ठेवून राहते. वीस फुट उंच दोरीवरून चालताना अर्जुन इंचही डगमगत नाही. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत केले तर काम फत्ते होते हेच या कृतीतून अर्जुन सर्वांना सांगतो. अनेक वर्षांपासून अर्जुनचा हा दोरीवरचा खेळ सुरू असल्याने त्याला त्याची सवय झाली आहे. आयुष्याची दोरी घट्ट करण्यासाठी अर्जूनचा हा दोरीवरचा प्रवास अजून किती दिवस सुरू राहणार हे संदिग्ध आहे. मात्र पोटासाठी सुरू केलेला खेळ बघणा-यांच्याही आयुष्याशी मिळता जुळता ठरतो आहे .जीवनात अनेक हेलकावे येत असतात. त्याला न डगमगता आपण धाडसाने पुढे जात राहिलो तर यशस्वी होऊ, हेच या खेळातून अर्जून सर्वांना संदेश देतो आहे.
अशोक पाटील, कोवाड


No comments:

Post a Comment