निट्टूर : कल्लापा हडलगेकर यांना निवडीचे पत्र देताना भारतीय मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब भोसले व इतर. |
कोवाड / प्रतिनिधी
निटूर (ता.
चंदगड) येथील कल्लापा धोंडीबा हडलगेकर यांची भारतीय मराठा संघाच्या चंदगड तालुका
युवा अध्यक्षपदी निवड झाली. जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब भोसले यांनी निट्टूर येथे
झालेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीत हडलगेकर यांना निवडीचे पत्र दिले. मराठा
समाज बांधणी व सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन हडलगेकर यांची निवड केल्याचे
जिल्हाध्यक्ष भोसले यांनी सांगितले. निवडीनंतर मराठा संघाच्या कार्यकर्त्यानी
हडलगेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रवीण पाटील, सुहास कोकितकर, सुनील
कोकितकर, विशाल पाटील, आकाश पाटील, वैभव
पुजारी, सुशांत खोराटे, पंकज
पाटील, सचिन पाटील, श्रेयश
पाटील, संदेश पाटील, शिवकुमार पाटील, भैरवनाथ
बुवा, जयकुमार पाटील उपस्थित होते. निवडीसाठी
जिल्हा सचिव सुदर्शन चव्हाण व संघटक विजय शिंदे यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment