माणगाव येथे श्री गणेश मंदिर वास्तूशांती व कळसा रोहण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2018

माणगाव येथे श्री गणेश मंदिर वास्तूशांती व कळसा रोहण सोहळा


माणगांव (ता . चंदगड) येथे वास्तुशांतीसाठी सज्ज असणारे श्री गणेश मंदिर.  छायाचित्र - आप्पाजी कांबळे ( माणगाव) 
अडकूर / प्रतिनिधी
माणगांव (ता. चंदगड) पंचक्रोशीतील गणेश भक्तांच्या व दानशूर व्यक्तींच्या देणगीतून साकारलेल्या आराध्य दैवत श्री गणेश मंदिर वास्तूशांती जिर्णोद्धार व कळसा रोहन सोहळा सोमवार 10 ते शुक्रवार 14 डिसेंबर 2018 या कालावधीत होणार आहे.
सोमवार दि 10 रोजी गणेश मूर्ती व कळसाचे गावात आगमन होणार आहे. दयानंद मठपती व सदानंद निटटूरकर यांच्या हस्ते कुंभपुजन होणार आहे. माणगावच्या सरपंच सौ. अश्विनी कांबळे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल. यावेळी पं. स. सदस्या सौ. मनिषा शिवणगेकर,  सौ. शोभा पाटील उपस्थित राहतील. सायंकाळी हरिपाठ, प्रवचन व किर्तनाचा कार्यक्रम होईल. मंगळवारी वास्तुशांती व होमवहन मारूती अर्जून वाडकर, नामदेव सुरूतकर, संजय वांद्रे, नंदकुमार बसरीकट्टी यांच्या हस्ते होणार आहे. रात्री श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व प्राथमिक शाळा माणगांव यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे. बुधवारी दिनकर बेनके यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना आहे. दहा वाजता बेळगाव दक्षिणचे आमदार अनिल बेनके यांच्या सत्काराचा कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, गोकुळचे संचालक राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, हेमरसचे युनिट हेड भरत कुंडल, संग्राम कुपेकर,  गोपाळराव पाटील, जगन्नाथ हुलजी यांच्या उपस्थितीत होईल.  गुरूवारी अभिषेक झाल्यानंतर रात्री कलाकार महोत्सव होणार असून संजय मंडलिक उद्घाटक म्हणून उपस्थित असतील. शुक्रवारी महाप्रसाद होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व सदस्य व ग्रामस्थ माणगांव,  श्री माणकेश्वर देवस्थान जिर्णोद्धार कमिटी माणगांव यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment