![]() |
पाटणे फाटा (ता. चंदगड) जवळील रस्त्यावर आलेल्या वडाच्या पारंब्या. |
कार्वे /
प्रतिनिधी
पाटणे
फाटा (ता. चंदगड) हे लोकांच्या वर्दळीचे ठिकाण आहे. गोकुळ संघाचे शितकरण केंद्र
असल्यामुळे दूधाच्या भरलेल्या गाड्या व ऊसाने भरलेले ट्रक या ठिकाणाहून ये-जा चालू
असते. नेमक्या शितकरण केंद्राकडे जाणाऱ्या वळणाच्या थोड्या अंतरावर वडाचे झाड असून
या झाडाच्या फांदया व पारंब्या बेळगांव-वेंगुर्ला रस्त्यावर आलेल्या आहेत.
वाहनचालकाला या पारंब्यामुळे समोरचे स्पष्ट दिसत नसल्यामुळे अपघात होत आहेत.
त्यामुळे या पारंब्या तोडाव्यात अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
पाटणे फाटा
येथील गोकुळ शितकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पारंब्या इतक्या खाली आलेल्या आहेत की,
शाळेला जाणारी मुले जाता-येता या पारंब्याचा उपयोग झोका घेण्यासाठी करत आहेत. काही
पादचारी डोक्याला पारंब्या लागून जखमी झालेले आहेत. रोजच दूधाच्या गाड्यांचे हूड, काचा
फुटणे, यासारखे अपघाताचे प्रकार घडत आहेत. सध्या
ऊसाचा सिझन चालू असल्यामुळे ऊस भरलेले ट्रॅक्टर व ट्रकना पारंब्या लागून ऊसाच्या
मोळ्या रस्त्यावर पडत आहे. या मोळ्या या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या इतरांना
त्रासदायक ठरत आहेत. या पारंब्या पादचाऱ्यांच्या अंगावर पडण्याची शक्यता नाकारता
येत नाही. त्यामुळे मोठ्या अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने
सदर झाडाच्या फांदया, पारंब्या तोडाव्यात अशी मागणी
नागरीकांच्याकडून होत आहे.
No comments:
Post a Comment