![]() |
तेऊरवाडी (ता. चंदगड) गावातील मुख्य गल्लीमध्ये असणारा विद्युत खांब मोडल्याने ग्रामस्थांनी खांबाला असा आधार दिला आहे. |
कोवाड /
प्रतिनिधी
तेऊरवाडी
(ता. चंदगड) येथील मुख्य गल्लीतील पाण्याच्या टाकीजवळचा विद्युत खांब मोडल्याने
संपूर्ण गाव अंधारात आहे. विद्युत महावितरण कंपनीने आज हा खांब सुस्थितीत आणण्याचा
प्रयत्न केला. पण त्याला अपयश आल्याने संपूर्ण गावातील विद्युत पूरवठा बंद
करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज संपुर्ण गाव अंधारात आहेत.
सध्या
गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
आले आहे. विजेवरच बोअरवेल पाणी योजना अवलंबून असल्याने सध्या पाणीप्रश्न गंभीर
बनणार आहे. महावितरण कंपनीने तात्काळ या ठिकाणी नवीन खांब उभा करून विज पुरवठा
सुरळीत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण मोडलेला खांब काही घरांच्या बाजुने
झुकलेला असल्यामुळे त्याच्यावरील विद्युत वाहक तारा गल्लीमध्ये पडून मोठा अपघात
होण्याची शक्यता आहे. सध्या आज या खांबाला आधार देवून बांधण्यात आले असले तरीही हा
खांब कोणत्याही क्षणी खाली कोसळू शकतो. त्यामूळे महावितरणने याची गंभीर दखल घ्यावी.
या ठिकाणी नवीन खांब उभा करुन वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत
आहे.
No comments:
Post a Comment