युवा फौंडेशन स्पर्धा केंद्रामार्फत किर्तीकुमारचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2018

युवा फौंडेशन स्पर्धा केंद्रामार्फत किर्तीकुमारचा सत्कार

कीर्तीकुमार बेनके याने थाळीफेकमध्ये देशात प्रथम क्रमांक पटाकवल्याबदद्ल युवा फाउंडेशन स्पर्धा परीक्षा केंद्रा" मार्फत सत्कार झाला. 

हलकर्णी / प्रतिनिधी
कार्वे (ता. चंदगड) येथील कुमार कीर्तीकुमार बेनके याने मेंगलोर विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धमध्ये थाळीफेक या क्रीडाप्रकारात ५२.७९ मीटर थाळी फेकून देशात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहोचविले. कीर्तीकुमार बेनके यांचे पाटणे फाटा  (ता. चंदगड) येथे "युवा फाउंडेशन स्पर्धा परीक्षा केंद्रा" मार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी युवा फाउंडेशन स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक तुकाराम पाटील यांनी कीर्तीकुमार बेनके यांचा सत्कार केला. यावेळी सचिन हुंदलेकर, रोहित बोकडे, परशराम पाटील, वैभव देसाई, कु कविता धामनेकर व कु विकास उपस्थित होते.


No comments:

Post a Comment