कोवाड-ढोलगरवाडी रस्त्याचे काम निकृष्ठ, नागरिकांनी पाडले बंद - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2018

कोवाड-ढोलगरवाडी रस्त्याचे काम निकृष्ठ, नागरिकांनी पाडले बंद

कोवाड - ढोलगरवाडी फाटा दरम्यान किणी येथे रस्याचे काम निकृष्ठ होत असल्यामुळे भावकू गूरवविवेक मणगूतकरगजानन पाटील, जॉन लोबो, सूरेश सूतारकिरण कोकीतकर आदीनी बंद पाडले.

कोवाड / प्रतिनिधी
कोवाड ते ढोलगरवाडी फाटा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून भाजपाचे तालूका युवा अध्यक्ष भावकू गूरव, मनसेचे विवेक मणगूतकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस जॉन लोबो, गजानन पाटील इतर नागरिकांनी या रस्त्याचे काम बंद पाडले. मात्र रात्री आठ वाजता या रस्त्यावर बीबीएम वर ठेकेदाराने डांबर टाकले.
गेली दहा वर्षे कोवाड ते ढोलगरवाडी दरम्यानचा रस्ता व्हावा म्हणून नागरिकांनी अनेक मोर्चे काढून अंदोलने केली. याची दखल घेत शासनाने या रस्ताला डांबरीकरण, रूदीकरण, गटर्स, मोरी बांधकाम साठी तीन कोटीचा निधी मंजूर केला. आठ दिवसापूर्वीच या रस्त्याचे काम सांगली येथील शिवपार्वती कंट्रक्शन या कंपनीने सुरू केले. कंपनीचा पोट ठेकेदार याने बांधकाम खात्याचे नियम धाब्यावर बसवून काम सुरू केले आहे. या कामावर टाकण्यात येणारे मुरूम हलक्या दर्जाचे आहे. बांधकाम खात्याचे अधिकारी ही या कामाकडे दूर्लक्ष करत आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ठ होत आहे. याबाबत ठेकेदाराला विचारले असता काय करायचे आहे ते करा असे सांगून ऊडवाऊडवीची ऊतरे देत आहे. कामात सुधारणा होत नाही. त्यामुळे दुपारी भावकू गूरव, विवेक मणगूतकर, जॉन लोबो, गजानन पाटील, किरण कोकीतकर, सूरेश पाटील,  मारूती बिर्जे,  सूरेश सूतार आदी कार्यकर्त्यांनी या रस्त्याचे चाललेले निकृष्ठ काम बंद पाडले. मात्र सदर ठेकेदाराने रात्री काम सूरू ठेवले.याबाबत बांधकामचे अधिकारी याना संपर्क साधला असता ते त्यांचा संपर्क होवू शकला नाही. या कामाबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तर कामाची ध्वनीफीत व काही पूरावे क्वॉलिटी कंट्रोल कडे पाठवण्यात आले आहेत.
रस्त्याचे काम बंद पाडल्यामूळे रस्त्यावर वहानांची अशी गर्दी झाली होती.





No comments:

Post a Comment