तुडये येथील असहाय्य धोंडीबाईला दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2018

तुडये येथील असहाय्य धोंडीबाईला दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची गरज



चंदगड / प्रतिनिधी
तुडये (ता. चंदगड) येथे राहणाऱ्या धोंडीबाई पाटील या असह्य महिलेला समाजातील दानशूर व्यक्तीने मदत करावी असे आव्हान चंदगड तालुका पत्रकार संघ व तुडये ग्रामस्थांनी केले आहे. वाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात धोंडीबाई ही महिला राहते. या महिलेचा पती असाद्य आजाराने वारल्यानंतर दोन मुलांसह  कुटुंबाचा गाडा चालवण्याची जबाबदारी धोंडीबाई यांच्यावर पडली. कोणतेही उत्पनाचे साधन नाही. मुळातच  बौद्धिक क्षमता नाही, त्यातच पतीचे निधन अशा विचित्र संकटात त्या सापडल्या आहेत. धोंडिबाईने आपल्या घरचा खर्च भागवण्यासाठी  ठिकठिकाणी मोलमजुरी करण्याची सुरू केले. असे असताना धोंडीबाईला नव-याच्या  असाध्य रोगाने पछाडले. मोठा मुलगा वात्रट असल्यामुळे त्याला त्या पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ हुलजी,  ग्रामपंचायती सरपंच कांबळे व इतर ग्रामस्थांनी मिळवून मुलाला आश्रम शाळेमध्ये ठेवले आहे. दुसरा मुलगा कशीबशी शाळा शिकत आहे. वडिलांच्या असाध्या आजाराची लागण आईला झाल्याची माहिती मुलांना नाही. लहान मुलगा आपल्या शाळेच्या साठी लागणारे साहित्य सामुग्री आईकडे म्हणजेच धोंडीबाईकडे मागतो. गावकऱ्यांच्या मदतीने तयार केलेल्या निवाऱ्यात धोंडीबाई राहते. सध्या तिची प्रकृती खालावली आहे.
याबाबत चंदगड लाईव्ह न्यूज  पोर्टल चॅनलचे सदस्यानी तुडये येथे घटनास्थळी भेट देवून परिस्थिती जावून घेतली. धोंडीबाईची भेट घेतली असता तिची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे जाणवले. या वेळी  प. स. चे माजी सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच कांबळे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धोंडीबाईची माहिती घेतली. यावेळी तिचा नवरा एका असाध्य रोगांमध्ये दगावला व त्याच्याच हजाराची लागण धोंडीबाई झाली. त्यामुळे सध्या ती जगण्यासाठी संघर्ष करत आहे. सध्या ग्रामस्थांच्या सहकार्याने तिची विचारपूस व थोडीफार मदत ही केली जात आहे. आपल्या मुलांचे काय होईल याची काळजी तीला भेडसावत आहे. आता समाजातील दानशूर व्यक्तीने या कुटुंबाला शक्य तेवढे आर्थिक सहाय्य करण्याची गरज आहे. याकामी चंदगड लाईव्ह न्यूज पोर्टल चॅनलचे अनिल धूपदाळे व संतोष सुतार यासह सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळवीकर आदींनी  विचारपूस केली. आर्थिक साह्य करू इच्छिणाऱ्यांनी जगन्नाथ हुलजी, सरपंच कांबळे यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. धोंडीबाई पाटील या महिलेला आर्थिक साहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी तिच्या बँक खात्यावर आर्थिक सहाय्य करावे असे गावचे सरपंच व पंचायत समितीचे माजी सभापती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment