![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र. |
सन 2016-17 च्या गळीत हंगामातील शेतकरी
सभासदांची ऊस बिलाची एफ. आर. पी. प्रमाणे रक्कम व पाटबंधारे खात्याची पाणी पट्टीची
थकीत रक्कम, साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार आर. आर.
सी. प्रमाणे वसुली करण्यासाठी कारखान्याच्या मालकीचा गट नं. 329 मधील 17 हेक्टर 38
आर इतक्या जमिनीचा लिलाव आज 7 डिसेंबर 2018 रोजी होणार होता. मात्र चंदगड पोलिस निरिक्षक
यांनी दिलेला अहवाल, कारखान्याच्या जमीन विक्रीला सर्व पक्षीय चंदगड वासियांचा
होणारा तीव्र विरोध व जन भावनांचा आदर राखून तालुक्यातील शेतकरी, कामगार, ऊस
उत्पादक, हितचिंतक यांचा विचार करुन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. यासाठी आज
होणारी जमिन विक्रीची लिलाव प्रक्रिया स्थगीत करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र
तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी प्रसिध्दीला दिले आहे.
याबाबत दौलतची जमीनीचा लिलाव करु नये, यासाठी चंदगड विधानसभा मतदार संघाच्या आमदार
श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनीही प्रयत्न केले. दौलतच्या बाबतीत आपण सदैव
जनतेच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी गुरुवारी (ता. 6) माजी राज्यमंत्री भरमू पाटील
यांनी आपल्या कार्यकर्त्यासह तहसिलदारांना हा लिलाव रद्द करण्यासाठी निवेदन दिले होते. त्याचबरोबर दौलत
बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर यांनी जमीन विक्रीला ग्राहकांनी प्रतिसाद देवू नये असे
आवाहन केले होते. यासंदर्भात 30 नोव्हेंबरला ॲड. मळविकर यांच्या पुढाकाराने दौलत कार्यस्थळावर
सर्वपक्षीय नेत्यांनी दौलतच्या जमिनीचा लिलाव होवू नये. याबाबत आग्रही भूमिका
मांडली होती. या सर्व मागण्यांची दखल घेत अखेर प्रशासनाने आज दौलत जमीनीची लिलाव
प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे हि दौलतची जमीन सद्यातरी शेतकरी, सभासदांच्या मालकीची
रहाणार आहे. त्यामुळे लोकांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment